गुरुवार, २९ जुलै, २०२१

Real Hero





  

   केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई ॲालेम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मीटर दूर होता त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते, अबेलने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते, सर्व प्रेक्षक त्याच्या नावांचा जल्लोष करीत होते, तेवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समजून अंतिम रेषेच्या एक मीटर आधीच थांबला. 


त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की अंतिम चिन्ह न समजल्यामुळे तो अंतिम रेषेच्या आधीच थांबला आहे. 


त्याने ओरडुन अबेलला पुढे जाण्यास सांगितले पण स्पॅनिश समजत नसल्याने तो हलला नाही शेवटी इव्हानने त्याला ढकलुन अंतिम रेषेपर्यंत पोचविले, त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला. 

Abel mutai and Ivan

पत्रकारांनी इव्हानला विचारले, "तू असे का केलेस? तुला संधी असतांना तू पहिला क्रमांक का घालवलास ?"


इव्हान ने सांगितले, "माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनू जी एकमेकांना मदत करेल. आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही." 


रिपोर्टर पुन्हा म्हणाला, "पण तू केनियन स्पर्धकाला ढकलुन पुढे आणलेस ?"


यांवर इव्हान म्हणाला, "तो पहिला आलेलाच होता ही रेस त्याचीच होती !"


पण रिपोर्टर पुन्हा म्हणाला, "पण तू सुवर्ण पदक जिंकू शकला असतास !"


"त्या जिंकण्याला काय अर्थ होता ? माझ्या मेडलला मान मिळाला असतां ? माझी आई काय म्हणाली असती ? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे पुढे जात असतात. मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते ?"


"दुसऱ्यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईनी मला दिली आहे."

बुधवार, २८ जुलै, २०२१

निसर्ग आणि मानवी जीवन


 पाणी ... 

Nature



      किती अद्भुत रसायन . जीवनाची सुरुवात या पाण्यापासूनच झाली आहे. सजीवांना जिवंत राहण्यासाठी मूलभूत आवश्यक घटक म्हणजेच - पाणी.

        मानवी स्वभाव आणि पाणी यामध्ये अनेक बाबतीत विशेष साधर्म्य जाणवते. नाल्याचे ओढ्याचे पाणी कसे खळखळून वाहते तसेच काही माणसे जीवन खळखळून आनंदाने जगतात. परंतु नाल्या ओढा प्रमाणे त्यांचे जीवन अल्प असते पण ते त्या अल्पशा जीवनात खूप भरभरून जगतात आणि इतरांना आनंद देतात. नदी कुठे कुठे संत वाहते कुठे नागमोडी वळणे घेत रौद्र रूप धारण करते. तर पावसात पूर आणून सर्वनाश करत निघते. माणसाचा स्वभाव तसाच असतो. शांत जीवन जगणारा कुणाशीही कधी देणेघेणे नसलेला माणूसही कधी कधी रौद्र रूप धारण करून आपले आणि संबंधिताच्या आयुष्यात कलह माजवून देतो . म्हणूनच शांत माणसांना कोणीही छेडण्याचा प्रयत्न करत नाही आणि करू पण नये . जसा स्वच्छ नितळ पाण्याचा तळ आपण स्पष्टपणे पाहू शकतो तर गढूळ पाण्याचा तळ आपल्याला समजत नाही. तसेच स्वच्छ मनाच्या माणसाला आपण सहज समजू शकतो तर दूषित मनाच्या मानवापासून दूरच राहणेच बरे कारण गढूळ पाणी आणि दूषित मनाचे माणसे आपल्याला नक्कीच बुडविणारे असतात . अशा पासून नेहमी सावध रहावे.


            निसर्ग आपल्याला नेहमी जीवन जगण्याची कला शिकवत असतो फक्त निसर्ग कडे निरीक्षक आणि चौकस दृष्टीने बघण्याची आवश्यकता आहे.

            निसर्ग आणि मानवी जीवनाचा संबंध हा अनंत काळापासून आहे. तो मानवाला प्रेमाने जीवन कला शिकवत असतो. परंतु मानव प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा समतोल बिघळवत आहे.  रोखणे ही काळाची गरज आहे

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

दिशाहीन मानवी समाज...

            दिशाहीन मानवी समाज मानवी समाज व्यवस्था  मानवी समाजाचा विचार करायचा झाला तर मानवाच्या उत्क्रांती पासून विचार करायला हवा . मानवाची...